शंभु खडी (घळई)


शंभु खडी (घळई)
शंभु खडी (घळई)

सांगली जिल्ह्यातील खानापूर या गावापासून अवघ्या सात ते आठ किलोमीटरवर निसर्ग निर्मीत घळई आहेत. जवळपास एक ते दोन किमी लांबीच्या या घळया सध्या उपेक्षित असून वनविभागाच्या अखत्यारीत येतात. निवडुंगाच्या काट्यातून वाट काढत आणि माज उतरवणारी कुसळ पार करत या घळई शोधणे म्हणजे दिव्य च आहे. पण इथ पोचल्यानंतर आपण जी निसर्गाची उधळण बघतो ती अतुलनीय आहे. रक्ताच्या रंगाची माती त्यावर गवताचे हिरवेगार गालिचे, नैसर्गिक रांजणातून झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचे मधुर संगीत सगळं कसं मनस्वी आनंद देतात. इथ सुरवातीला टेकडी वर एक महादेवाचं मंदिर लागतं ज्यावरूनच या भागाचं नाव शंभू खडी अस पडलं.जवळपास सत्तर ते ऐंशी फूट खोल दऱ्या आणि त्यात निसरडी माती त्यामुळं इथ प्रत्येक पाऊल जपूनच टाकायचं. पुढील व्हिडिओ वरून त्याचा अंदाज येईल😂



 


शंभु खडी (घळई)
शंभु खडी (घळई)

शंभु खडी (घळई)
शंभु खडी (घळई)

शंभु खडी (घळई)
शंभु खडी (घळई)

शंभु खडी (घळई)
शंभु खडी (घळई)

शंभु खडी (घळई)
Youtuber and bank manager @शंभु खडी (घळई)

शंभु खडी (घळई)
शंभु खडी (घळई)

शंभु खडी (घळई)
शंभु खडी (घळई)

शंभु खडी (घळई)
शंभु खडी (घळई)

शंभु खडी (घळई)
शंभु खडी (घळई)

शंभु खडी (घळई)

शंभु खडी (घळई)

रक्त स्तर (Red beds)

इथं जी माती आहे तिला शास्त्रीय भाषेत "रक्त स्तर" (Red Beds ) म्हणतात. हे रक्त स्तर फक्त याच भागात आढळतात. हे रक्त स्तर तृतीयक काळात तयार झाले. तृतीयक काळ म्हणजेच चार ते पाच कोटि वर्षांपुर्वीचा काळ. हवामान अर्धशुष्क असताना आद्य तृतीयक जांभा खडकापासुन अंशत: आणि नंतर उत्तर तृतीयक काळातील मृदा अवसादन प्रक्रियामुळे तयार झाले असावेत. यांना पुराभुआकार (Palaeogeomorphic), पुराहवामान (Palaeoclimatic), आणि विवर्तनकिय (Palaeotectonic) अभ्यासाच्या दृष्टिने महत्व आहे. या रक्त स्तरांमध्ये ढोबळ स्तरिकरण, क्रमित स्थर निर्मिती आणि अवसादिकरणाची इतर वैशिष्ट्ये दिसुन येतात. या थरांमध्ये माँटमोरोलिनाईट, नॅट्रोनाईट, केओलिनाईट, हेमटाईट, गोएथाईट आणि अल्कली मृत्तिकांचिही गाढता आढळते.

मुख्य म्हणजे हा रक्त स्तर फक्त खानापुर परिसरातच आढळतो. कोकणात अथवा ईतर ठिकाणी आढळणाय्रा खडकाला जांभा खडक म्हणतात.